औरंगजेबाच्या मजारच्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याचे धैर्य दाखवा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
छत्रपती संभाजीनगर – गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्याने वाद झाल्याचे समोर आले आहेत, तर कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे छायाचित्र स्टेटस ठेवण्यावरून हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भाजपवर टीका करतांना म्हणाले की, औरंगजेबचा भाजपला एवढाच तिटकारा असेल, तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबच्या मजारला (कबरीला) असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा, असे पत्र दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत दाखवा, असे आव्हान १० जून या दिवशी ट्विटरवरून केले आहे.
मग #मोदी आणि थोरल्या छत्रपतींची अशी तुलना चालते का?
साधी मागणी आहे माझी, लिहा एक पत्र तुमच्या दिल्लीच्या पातशाहांना. काढा म्हणा ‘संरक्षित स्मारकाचा दर्जा’….. https://t.co/xOZnD4K1d9
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 10, 2023
‘बाटलीतून भूत’ बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा… https://t.co/QYdRxOh03o
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 10, 2023
अंबादास दानवे म्हणाले की, मोगल बादशाह औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे छायाचित्र झळकावणे आणि ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ ठेवण्यावरून राजकारण चालू असतांना औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहेत. यात अल्पवयीन मुले सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ‘ब्रेनवॉश’ करणारी यंत्रणा कोण आहे ? हे पहाणे आवश्यक आहे.
कामांच्या आधारावर महाराष्ट्रात मत मागण्याची ताकद भाजपमध्ये नाही!
– @iambadasdanve, विरोधी पक्षनेते pic.twitter.com/bmae0wZUFQ
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 10, 2023
संपादकीय भूमिका :
|