(म्हणे) ‘औरंगजेबाचा ‘राज्याभिषेक सोहळा’ साजरा करा !’
‘व्हॉट्सअॅप’वरील पोस्टमुळे पुन्हा तणाव !
छत्रपती संभाजीनगर – येथील अताऊर रेहमान पटेल या धर्मांधाने १३ जून या दिवशी ‘औरंगजेबाचा राज्याभिषेक जल्लोषात साजरा करा’, अशी पोस्ट व्हॉट्सअॅपवरून प्रसारित केल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने स्थिती नियंत्रणात आहे.
अताऊर रेहमान पटेल याने या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘१३ जून १६५९ या दिवशी औरंगजेबाचा राज्याभिषेक झाला. त्याचा वर्धापनदिन सर्वांनी धुमधडाक्यात साजरा करावा. यासमवेत अमरावती जिल्ह्यातील वलगावमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या व्हॉट्सअॅपवरून आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. (‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा मजकूर) दुसर्या गटाने त्याच्या विरोधात वलगाव पोलीस ठाण्यामध्ये दुपारी तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी स्टेटस ठेवणार्या व्यक्तीची चौकशी चालू केली. त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांच्या विनंतीनंतर आक्षेपार्ह स्टेटस काढून टाकले; मात्र ही बातमी पसरल्यामुळे रात्री विलंबाने वलगाव येथील मुख्य चौक आणि बाजारपेठ येथे २५० ते ३०० लोक समोरासमोर उभे ठाकले; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी समजूत काढल्यानंतर तणाव निवळून जनजीवन सुरळीत झाले.
संपादकीय भूमिका :छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदोउदो पुनःपुन्हा चालू रहाणे संतापजनक आहे ! औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्याविषयी सातत्याने पोस्ट टाकून महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे मोठे षड्यंत्र चालू नाही ना, याची पोलीस आणि प्रशासन यांनी चौकशी करावी. संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |