खेड तालुक्यातील १३ जणांची लाखो रुपयांची फसवणूक
विदेशात नोकरी देण्याचे आमीष !
रत्नागिरी – विदेशात नोकरी लावून देतो, असे सांगत १३ जणांची १४ लाख ३५ सहस्र रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार मोहम्मद सलीम अब्दल्ला सैन यांनी खेड पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.
तालुक्यात साखरोली येथे रहाणार्या एका ‘एजंट’ने कुवेत, तुर्की, मलेशिया आदी देशांमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून १३ जणांकडून ‘ऑनलाईन’ १४ लाख ३५ सहस्र रुपये स्वीकारले. त्यानंतर त्या एजंटने संबंधितांना ‘व्हिसा’, ‘लायसन्स’, तिकिटे आणि काही कागदपत्रेही दिली; मात्र ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर एजंटच्या विरोधात तक्रार करण्यात आली.