तृणमूल काँग्रेसच्या २ गटांनी १०० ठिकाणी एकमेकांवर बाँब फेकले !
|
कोलकाता (बंगाल) – दक्षिण परगणा जिल्ह्यातील कैनिंग शहरात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या २ गटांमध्ये हिंसाचार झाला. या वेळी १०० ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये २ गटांमधील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले. बंगालमध्ये ८ जुलै या दिवशी पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा हिंसाचार झाला.
Yesterday, bombs were hurled to stop Opposition candidates from filing nominations in the Panchayat poll… These are visuals from Bhangar, just behind New Town, on the outskirts of Kolkata, the seat of power in Bengal.
Democracy is being stifled under Mamata Banerjee’s watch… pic.twitter.com/hOOR01y0KR
— Amit Malviya (@amitmalviya) June 14, 2023
१. कैनिंग शहरात पंचायत समितीची निवडणूक लढवणार्या उमेदवारांची सूची अंतिम करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी २ गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले.
२. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते सैबल लाहिडी यांच्या समर्थकांनी बसस्थानकाच्या बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक रोखली. लाहिडी यांच्या समर्थकांनी आरोप केला की, ते प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज भरायला जात असतांना तृणमूल काँग्रेसच्या दुसर्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. दुसर्या गटातील कार्यकर्ते हे तृणमूल काँग्रेसचे आमदार परेश राम यांचे जवळचे मानले जातात.
३. बांकुडा जिल्ह्यामध्ये पोलीस नियमितची गस्त घालत असतांना त्यांनी चारचाकी गाडीतून एक बॅग कह्यात घेतली. त्यात १२ बाँब होते. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.
४. राज्यात पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांना संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तैनात करण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिका
|