रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित !
नवी देहली – ‘लंडन सेंट्रल बँकिंग’च्या वतीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना वर्ष २०२३ चा ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनाही याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यानंतर दास हे हा पुरस्कार मिळणारे दुसरे भारतीय गव्हर्नर आहेत.
शक्तिकांत दास को मिला दुनिया के बेस्ट गवर्नर का खिताब: सेंट्रल बैंकिंग ने RBI गवर्नर को ‘गवर्नर ऑफ द ईयर’ अवॉर्ड से सम्मानित कियाhttps://t.co/b0zKUAEeBk#RBI #RBIChief #ShaktikantaDas #GovernorOfTheYear pic.twitter.com/xEVHF8EdHm
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 14, 2023
दास यांनी वर्ष २०१८ मध्ये त्यांचा पदभार सांभाळल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले. २ सहस्त्र रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णयही नुकताच त्यांच्याच अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कोरोना काळातही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सध्या वैश्विक स्तरावरील अर्थक्षेत्रातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतात महागाईवर नियंत्रण मिळवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.