अजित डोवाल, म्हणजे आंतराष्ट्रीय ठेवा !

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कौतुक !

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

नवी देहली – भारतात असलेले अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांचे कौतुक करत म्हटले की, डोभाल हे केवळ एक राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ठेवा आहेत. भारतीय उद्योग परिसंघाच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी भारताने डिजिटल क्षेत्रात केलेल्या क्रांतीचेही पुष्कळ कौतुक केले.

या वेळी ते म्हणाले की, आपण ‘फोर जी’, ‘फाइव्ह जी’, ‘सिक्स जी’ यांसारख्या तंत्रज्ञानाविषयी बोलतो; परंतु भारताकडे त्यापेक्षा अधिक शक्तीशाली तंत्रज्ञान आहे आणि ते म्हणजे ‘गुरुजी.’