साधिकेच्या शारीरिक त्रासांमध्ये वाढ झाल्यावर तिच्या पायाच्या अंगठ्यावर चंदेरी रंगाचे दैवी कण आढळणे
१. साधिकेला होत असलेला पोटाचा त्रास दूर होण्यासाठी निसर्गाेपचार तज्ञांनी केलेले उपचार
‘मला होत असलेला पोटाचा त्रास दूर होण्यासाठी १६.१०.२०२१ या दिवशी मी निसर्गाेपचार तज्ञांकडे गेले होते. त्यांनी माझे बोलणे ऐकून ‘नाभी सरकली आहे’, असे सांगितले. त्यांनी माझे पोट चोळले आणि डाव्या पायाचा अंगठा ओढला. त्या वेळी मला काही जाणवले नाही.
२. आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घेऊनही पायाचा त्रास दूर न होणे
त्यानंतर मला सहजतेने चालता येत नव्हते. दोन दिवसांत माझ्या पायाचे दुखणे आणि पायावरील सूज वाढली. एका रुग्णालयात तपासणी केल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘डाव्या पायाच्या नसेला दुखापत झाली आहे.’’ आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे १० दिवस घेऊनही माझ्या पायाचा त्रास न्यून होत नव्हता.
३. तेव्हा ‘त्रासाचे कारण आध्यात्मिक आहे’, असे मला जाणवले.
४. त्या आठवड्यात २ – ३ वेळा माझ्या त्या पायाच्या अंगठ्यावर चंदेरी रंगाचे दैवी कण आढळले.
आता माझा पायाचा त्रास दूर झाला आहे आणि पोटाचा त्रास ३० टक्के इतक्या प्रमाणात उणावला आहे.’
– कु. स्नेहल सोनीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२९.१०.२०२१)
|