अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट फक्त केरळपुरता मर्यादित नसून देश-विदेशात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र चालू आहे. या चित्रपटातून ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचे वास्तव समोर आले आहे. या चित्रपटाला काही पक्षांचे राजकीय नेते विरोध करत असतील, तर अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का ? ‘लव्ह जिहाद’ आणि ‘आतंकवाद’ यांचे वास्तव न स्वीकारून ‘हा चित्रपट मुसलमानांच्या विरोधात आहे’, असा भ्रामक प्रचार केला जात आहे. हिंदु समाज आता जागृत असून ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी अनेक लोक सामाजिक माध्यमांसह विविध माध्यमांतून प्रसार करत आहेत, तेही अभिनंदनास पात्र आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ यांसारखे हिंदूंना जागृत करणारे अनेक चित्रपट बनवणे आवश्यक आहे.