शिक्षा (शिक्षण) जिहाद !

‘शिक्षा (शिक्षण) जिहाद’ची पाळेमुळे शोधून ती खोदून काढण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी कंबर कसावी !

लव्ह जिहादची प्रकरणे देशभर उघडकीस येऊन वादंग माजला आहे. ‘हा लव्ह जिहाद आहे का ? ते पहावे लागेल’, असे मथळे आता पुरोगामी प्रसारमाध्यमेही देऊ लागली आहेत, इतपत ते स्वीकारार्ह झाले. हिंदू जागरूक झाल्याने हे लोण वाढत जाईल. त्यामुळे धर्मांतराच्या एका प्रयत्नांवर काही अंशी मर्यादा येण्याची शक्यता पुढील काळात वाढू शकते, अशी चिन्हे दिसत असतांनाच मुसलमानांकडून ख्रिस्त्यांप्रमाणे शैक्षणिक माध्यमातून हिंदु विद्यार्थ्यांचे, म्हणजेच देशाच्या भावी पिढीचे इस्लामी शिक्षण देऊन ‘ब्रेन वॉश’ करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मध्यप्रदेशमधील दमोह येथील ‘गंगा-जमुना’ शाळेतील अनेक प्रकरणे बाहेर पडली. विद्यार्थिनींना हिजाब घालायला लावणे, शाळेत इस्लामी धर्माचे विचार लिहिणे, देशाचा चुकीचा नकाशा दाखवणे, विद्यार्थ्यांना इस्लामी प्रार्थना म्हणण्याची बळजोरी करणे, हे प्रकार उघडकीस आल्याने तेथील गृहमंत्र्यांनी शाळेच्या अनधिकृत बांधकामाविषयी स्पष्टीकरण मागवले असून आता तिथे ‘बुलडोझर’ चालवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शाळेतून मशिदीपर्यंत एक गुप्त रस्ताही निर्माण केल्याचे पुढे आले. या प्रकरणाच्या पाठोपाठच महाराष्ट्रातील मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील धर्मांतराच्या प्रयत्नांचे प्रकरण पुढे आले आहे, जे अतिशय गंभीर आहे. येथे एन्.सी.सी.च्या (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली इस्लामी उपासनापद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी तब्बल ४० मौलवींना पाचारण करण्यात आले होते. हिंदु विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाला विरोध करून एक प्रकारे हा कार्यक्रम उधळला. गाझियाबाद आणि मुंब्रा येथील ‘गेम जिहाद’च्या प्रकरणी ‘धर्मांतरा’चे पुरावे मिळत नसल्याचे सांगत मुंब्र्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आरडाओरड करत आहेत. कदाचित् ‘अद्याप कुणाचे प्रत्यक्ष धर्मांतर झालेही नसेल’, असे काही क्षण गृहीत धरले, तरी ‘मुलांना खेळात जिंकण्यासाठी इस्लामी आयते म्हणण्यास का लावत होते ?’, याचे उत्तर त्यांच्याजवळ आहे का ? मालेगाव प्रकरणीही असेच गदारोळाचे वक्तव्य कुणी करू शकतात; परंतु प्रत्यक्ष धर्मांतराचा विधी झाला नसला, तरी ‘इस्लामची शिकवण विद्यार्थ्यांना या-ना त्या मार्गाने देणे’, हेच धर्मांतराचा उद्देश स्पष्ट करणारे आहे. आज २ प्रकरणे उघडकीस आली आहेत, याचाच अर्थ हा ‘शिक्षा (शिक्षण) जिहाद’ संपूर्ण भारतात कुठे ना कुठे चालू असणार, याविषयी शंकाच नाही; कारण जिहाद्यांचे धर्मांधांना आदेश निघतात, त्यामुळे सर्वत्रचे धर्मांध जिहादी कृत्ये करतात. बाँबस्फोट, दंगली, हिंदूंच्या हत्या, सर्व प्रकारचे जिहाद हे ते देशभर अनेक ठिकाणी करतात.

देशभरातील पाळेमुळे शोधा !

आता केंद्रीय गृहमंत्रालयाने संपूर्ण देशात असे कुठे कुठे चालू आहे ? त्याची पाळेमुळे शोधून ती स्वतःहून खोदून काढली पाहिजेत. येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयोजित करणार्‍या ‘सत्य मलिक लोकसेवा ग्रुप’ या संस्थेवर गुन्हा नोंद झाला; परंतु हे वरवरचे ठरेल. महाविद्यालय या इस्लामी संस्थेला पाचारण करते, याचा अर्थ महाविद्यालय ‘या कार्यक्रमात काय होणार ?’ याविषयी अनभिज्ञ होते, असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. तसे जर असेल, तर ते अधिक गंभीर आहे; मात्र यांपैकी काहीही असले, तरी ‘महाविद्यालय एक प्रकारे मौलवींच्या अधीन झाले’, हेच यातून उघड होते. ‘महाविद्यालयाचे व्यवस्थापन यासाठी किती उत्तरदायी आहे ? कि तेही जिहादी मुसलमानांना मिळालेले आहे ?’, याचा शोध येथे घेणे अपरिहार्य ठरत आहे.

तब्बल ४० मौलवी महाविद्यालयात एकत्र येतात, तेव्हा ‘हे किती मोठ्या स्तरावरील षड्यंत्र आहे’, याची व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. ‘लोकसेवा’ करणार्‍या या संस्थेला अर्थपुरवठा कोण करते ? हे बाहेर आले की, या धर्मांतराच्या षड्यंत्राची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्याप्ती कळेल. लव्ह जिहादद्वारे एकएकट्या मुलींना फसवणारे जिहादी इस्लामी आता मोठ्या संख्येने हिंदु विद्यार्थ्यांनाच गळाला लावायला निघाले आहेत. हिंदूंच्या महाविद्यालयात उघडपणे, असे करण्याचे जिहाद्यांचे धैर्य होते, याला उत्तरदायी हिंदूच आहेत. ‘मालेगावसारख्या मुसलमानबहुल भागात हे होते’, यालाही बराच अर्थ आहे. मुसलमानबहुल भागात हिंदूंनी अधिक सावध रहाण्याऐवजी ते अशा प्रकारे मुसलमानांच्या अधीन झालेले असतात का ? राज्य आणि देश यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांनी आता चांगलेच सतर्क झाले पाहिजे. त्यांच्या शाळेत ‘कुठे ना कुठे घुसखोरी करून धर्मांध असा डाव खेळत नाहीत ना ?’, हे त्यांनी पडताळले पाहिजे. धर्मांध जिहादसाठी विविध क्लृप्त्या योजतात. हे लक्षात घेऊन ‘हा ‘शिक्षा (शिक्षण) जिहाद’ शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग येथे नाही ना ?’, हे पडताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने शाळा-महाविद्यालये यांमध्ये काही प्रतिबंधात्मक नियम घालावेत किंवा सूचना द्याव्यात. आता २ उदाहरणे समोर आली. याकडे दुर्लक्ष केले, तर कुणी सांगावे वर्ष-दोन वर्षांत ‘शिक्षा (शिक्षण) जिहाद’चे अक्राळविक्राळ स्वरूप समोर येईल !

पोलीस पाकिस्तानचे का ?

या प्रकरणी ‘हिंदु विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे पोलीस प्रशासन पाकचे का ?’, असा संतापजनक प्रश्न हिंदूंना पडला आहे. दादा भुसे यांच्यासारखा प्रखर हिंदुत्वनिष्ठ मंत्री तिथे नसता, तर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना दाद दिली असती, असे वाटत नाही. ‘राज्यात हिंदूंचे शासन आहे’, असे हिंदूंना वाटण्यासाठी नवनवीन गवताप्रमाणे उगवणार्‍या जिहादी कृत्यांना मुळासकट उपटण्याचे काम त्याने करायला हवे. हिंदूंना आता आश्वासने नकोत. ते संघटित झाले आहेत. पोलिसांना हिंदूंच्या तक्रारींवर गांभीर्याने कृती करण्याचे आदेश दिले, तरच राज्यातील जिहादी कृत्यांना आळा बसेल. छत्रपतींना आदर्श मानणार्‍या गृहमंत्रालयाला ते अशक्य नाही; केवळ इच्छाशक्ती हवी !