जुहू समुद्रकिनार्यावर बुडलेल्या ५ मुलांपैकी एक जण वाचला !
मुंबई – मुंबईतील जुहू समुद्रकिनारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेली ५ मुले समुद्रात बुडली होती. त्यांतील एका मुलाला वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले; मात्र चौघे बेपत्ता झाले होते. त्यांतील दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत, तर अन्य दोघांचा शोध चालू आहे. ही मुले १२ ते १५ वयोगटातील होती. समुद्रकिनार्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर आतमध्ये ही मुले गेली होती. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना किनार्यावर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही मुले वाकोला (सांताक्रूझ) परिसरातील होती.