अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांधांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार
उत्तरप्रदेश येथे ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उजेडात !
बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बरेली येथून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून शाह आलम नावाच्या मुसलमानाने तिला उत्तराखंडमधील काशीपूर येथे नेले. तेथे शाह आलम याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला इरफान नावाच्या मुसलमान तरुणाकडे सोपवले. इरफानने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला नदीम कुरेशीच्या स्वाधीन केले. कुरेशीने पीडित हिंदु मुलीवर बलात्कार केला आणि तिला काशीपूर रेल्वेस्थानकावर सोडून दिले. ११ जून २०२३ या दिवशी पोलिसांनी काशीपूर रेल्वेस्थानकावरून पीडित मुलीला कह्यात घेतले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बरेली से एक नाबालिग हिंदू लड़की को अगवा कर शाह आलम उत्तराखंड ले गया। रेप करने के बाद उसे इरफान और नदीम कुरैशी के हवाले कर दिया।https://t.co/dlj5CwFdXN
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 12, 2023
बरेलीतील परौरा गावात रहाणार्या एका १७ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या भावाने प्रविष्ट केली होती. या तक्रारीमध्ये शाह आलमचे नाव मुख्य आरोपी म्हणून होते. ६ जून २०२३ या दिवशी पीडिता तिच्या आईचे कपडे घेण्यासाठी शिंप्याच्या दुकानात गेली; मात्र ती घरी परतलीच नाही, असे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास चालू केला. ११ जून २०२३ या दिवशी पोलिसांनी काशीपूर रेल्वेस्थानकावरून पीडित मुलीला कह्यात घेतले. यानंतर शाह आलम, इरफान आणि नदीम कुरेशी यांनी अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
UP : बरेली में छात्रा का अपहरण कर तीन दोस्तों ने बारी-बारी से किया दुष्कर्म, मन भर गया तो 500 रुपए देकर छोड़ दिया
◆ पुलिस को आरोपी शाह आलम, इरफान, नदीम कुरैशी की तलाश है#Crime | Crime | Rape Victim | Uttar Pradesh pic.twitter.com/72ft5OnEKd
— News24 (@news24tvchannel) June 12, 2023
या प्रकरणातील मुख्य आरोपी शाह आलम (वय ५० वर्षे) हा गावच्या प्रमुखाचा नातेवाईक आहे. शाह आलम याने याआधीही गावातील आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्याच्या विरोधात पोलिसांत ५ गुन्हे नोंद आहेत. (अशांवर वचक बसेल, अशी कारवाई न केल्याचा परिणाम ! हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिकालव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांधजुमानत नसतील, तर त्या कायद्यात फाशीसारख्या तरतूदी करून तो आणखी कठोर केला पाहिजे ! |