युवा कार्यशाळेच्या वेळी पू. अशोक पात्रीकरकाका (वय ७३ वर्षे) यांचे मार्गदर्शन ऐकतांना साधिकेला आनंद जाणवणे
‘२७.१०.२०२२ ते १.११.२०२२ या कालावधीत सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात युवाकार्यशाळा होती. या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी पू. अशोक पात्रीकरकाकांनी ‘साधनेमध्ये सातत्य कसे ठेवावे ?’ या आणि अन्य विषयांवर मार्गदर्शन केले. पू. पात्रीकरकाकांचे सत्र चालू होऊन ते बोलू लागल्यावर माझी दृष्टी त्यांच्यावर ५ – १० मिनिटांपर्यंत स्थिर झाली. माझी दृष्टी त्यांच्यावरून दूर जातच नव्हती. त्या वेळी माझ्या शरिरावर २ मिनिटांसाठी रोमांचही उभे राहिले आणि माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद जाणवत होता.’
– कु. आकांक्षा घाडगे, (वय २२ वर्षे), पुणे. (२८.१०.२०२२)
|