‘सारखी उचकी लागणे’, या विकारावरील नामजप केल्यावर उचकी लागणे थांबून साधकाला शांत झोप लागणे
१. ‘वर्ष २०२१ मध्ये एकदा मला उचकी लागली. तेव्हा ‘पाणी पिणे, साखर खाणे’, असे उपाय करूनही माझी उचकी थांबत नव्हती. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करावे लागले, तरीही नेमके निदान झाले नाही. शेवटी सद़्गुुरु अनुराधा वाडेकर आणि सद़्गुुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने मिळालेला मंत्रजप केल्यावर मला बरे वाटले.
२. ३.४.२०२३ या दिवशी रात्री १२.३० वाजल्यापासून मला उचकी लागली. तेव्हा काही केल्या माझी उचकी थांबत नव्हती. २ वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच प्रसंगामुळे आम्हाला चिंता वाटू लागली. माझी पत्नी सौ. शीला हिने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप’ या लेखात ‘सारखी उचकी लागणे’, या विकारावरील नामजप पाहून तो मला करावयास सांगितला. ती स्वतः माझ्या जवळ बसून तो नामजप करू लागली. अनुमाने रात्री २.३० वाजता जप करता करता माझी उचकी थांबली आणि मला शांत झोप लागली.
या प्रसंगावरून ‘आपत्काळात परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, अशी दृढ श्रद्धा माझ्यामध्ये निर्माण झाली’, याबद्दल मी गुरुमाऊली आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. सतीश अनंत दातार, बेंगळुरू, कर्नाटक. (५.४.२०२३)
|