मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !
|
शिमला (हिमाचल प्रदेश) – रुक्साना नावाच्या एका मुसलमान मुलीवर प्रेम असणार्या २१ वर्षीय मनोहर या हिंदु तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुक्सानाचा भाऊ शबीर याला अटक करण्यात आली आहे. शबीरने मनोहरची हत्या करून त्याच्या शवाचे ८ तुकडे करून ते एका पोत्यात बांधले. ते पोते ९ जून या दिवशी एका नाल्यात सापडले. या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक मुसलमानांनी रुक्सानाच्या कुटुंबावर बहिष्कार घातल्याचे सांगितले जात आहे.
रुक्सानाच्या कुटुंबावर स्थानिक मुसलमानांनी घातलेला बहिष्कार, हे नाटक ! – भाजपस्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रुक्सानाच्या कुटुंबियांनी मनोहरची हत्या केल्यामुळे स्थानिक मुसलमानांनी त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार घातला आहे. भाजपचे स्थानिक नेते अजय टंडन यांच्या मते मुसलमानांचे हे केवळ एक नाटक असून कालांतराने ते सर्व एक होतील. |
१. राज्यातील चम्बा येथील सलूनी भागात असलेल्या बांदल गावात रहाणारा मनोहर ६ जूनपासून गायब होता. अचानक ९ जून या दिवशी तेथील एका नाल्यात दुर्गंधी येऊ लागली. लोकांनी याची पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलिसांनी नाल्यातील पोते बाहेर काढले असता त्यात एका शवाचे ८ तुकडे केल्याचे पोलिसांना आढळले. चौकशीअंती हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मनोहरच्या असल्याचे निष्पन्न झाले.
(सौजन्य : INDIA’S18 News Network)
२. मनोहर आणि रुक्साना यांच्यात प्रेमसंबंध होते. रुक्सानाच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते.
३. मनोहरच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तिने रुक्सानाचे काका मुसाफिर यांनीही शबीरला साहाय्य केल्याचा आरोप केला आहे.
४. या प्रकरणी बजरंग दलासह स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर तसे केले गेले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिका
|