मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू
पनवेल – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ भरधाव वेगाने रसायन घेऊन जाणारा टँकर दुपारी पलटी होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत.
As many as four people were killed after a petrol tanker overturned on the #PuneMumbaiExpressway on Tuesday at around 12 pm.https://t.co/ngSZFRwmLS
— IndiaToday (@IndiaToday) June 13, 2023
टँकरमधील केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणार्या चार व्यक्ती आणि काही वाहने यांवरही सांडले. परिणामी पुलाखालील वाहनांनी पेट घेतला. आग लागल्यावर काही वेळ दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पाऊस आल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले.
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
राज्य पोलिस दल,…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 13, 2023
याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि राज्य पोलीस दल, महामार्ग पोलीस, अग्नीशमनदल आदी सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आग आटोक्यात आली असल्याची माहिती दिली.