नेदरलँड्सच्या यूट्यूबरसमवेत गैरवर्तन करणार्या नवाब हयात शरीफ याला अटक !
(यूट्यूबर म्हणजे ‘यू ट्यूब’द्वारे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती)
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे नेदरलँड्सचे यूट्यूबर पेड्रो मोटा यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी नवाब हयात शरीफ याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, विदेशी पर्यटकांसमवेत अयोग्य व्यवहार करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.
A man grabbed YouTuber’s hand and started shouting. #YouTube #DutchVlogger #Bengaluru https://t.co/KDEY4srz5i
— Republic (@republic) June 12, 2023
डच नागरिक असलेले पेड्रो मोटा यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये नवाब हयात शरीफ हा मुसलमान मोटा यांचा हात पकडून तो मुरगळत असल्याचे दिसत आहे. तो मोटा यांना ते बेंगळुरूमध्ये काय करत आहेत ? आणि त्यांच्या हातात काय आहे ?, अशा प्रकारे जाब विचारत आहे. मोटा यांनी या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करून बेंगळुरूमध्ये त्यांना आलेला कटू अनुभव सांगितला. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत नवाब हयात शरीफ याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
पेड्रो मोटा यांचे ‘MadlyRover’ आणि ‘iPedroMota’ नावाचे दोन यूट्यूब चॅनल्स असून त्यांचे अनुक्रमे ३० सहस्त्र २०० अन् ७७ सहस्त्र ९०० अनुयायी आहेत.
संपादकीय भूमिकाभारताचे नाव कलंकित करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |