(म्हणे) ‘भारत सरकार ट्विटरवर बंदी घालणार होते !’ – ट्विटरचे हिंदुद्वेष्टे सहसंस्थापक जॅक डॉर्से
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्से यांनी भारत सरकारवर आरोप केले आहेत. साम्यवादी विचारसरणीचे असलेल्या हिंदुद्वेषी डॉर्से यांनी म्हटले आहे की, भारतात ज्या काळात कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलने चालू होती, तेव्हा भारत सरकारने ट्विटरवर दबाव आणला होता. शासनाने त्यांच्या विरोधात लिखाण करणार्या काही पत्रकारांसमवेत काही ट्विटर खाती बंद करण्यास आम्हाला वारंवार सांगितले होते. तसेच आम्ही ही कारवाई केली नाही, तर आमच्यावर भारतात बंदी आणली जाईल, भारतातील आमच्या अधिकार्यांच्या घरांवर छापेमारी केली जाईल, अशी धमकी आम्हाला देण्यात आली होती.
#Twitter के को-फाउंडर जैक डोर्सी ने भारत सरकार पर लगाया धमकाने का आरोप बोले- बात माने नहीं तो तुरंत बैन कर देंगे@Twitter #JackDorsey #TwitterCEO #India @DBhaskarHindi @bhaskarepaper #AdipurushBookings #Jawan #Gadar2Teaser #CycloneBiparjoy #WorldCup2023 https://t.co/voNnApd5sH
— Dainik Bhaskar Hindi (@DBhaskarHindi) June 13, 2023
यावर अजूनपर्यंत केंद्रशासनाच्या वतीने कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नसली. तथापि युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. जॅक डॉर्से यांनी अशा प्रकारचेच दावे हे तुर्कीये सरकारवरही केले आहेत.
संपादकीय भूमिका
|