नाशिक येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने तक्रार प्रविष्ट !
भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांची अपर्कीती केल्याचे प्रकरण
नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांची मानहानी आणि अपर्कीती केल्याविषयी फौजदारी गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चा पदाधिकार्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात नुकताच तक्रार अर्ज केला आहे. ‘जिजाऊ आणि सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही’, असे तक्रारीत म्हटले आहे. ‘पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास राज्यभरात महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
🕗 जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा ; भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी.#NCP #MLA #jitendraawhad #Chitrawaga#infamous #infactor #Text #Twitter #Uploaded#Allegedly #solapur #BJP #women #activists #Filed #case #demand pic.twitter.com/j0nZxuN74o
— RNO | Right News Online मराठी (@RNO_OfficialM) June 12, 2023
आमदार आव्हाड यांनी सौ. चित्रा वाघ यांची अपर्कीतीकारक माहिती ‘ट्विटर’वर अपलोड केली आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करून त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.