गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी
|
मडगाव, १२ जून (वार्ता.) – केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. दानपेटी देवळाच्या मागे टाकण्यात आली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रीकरणात दोघे जण तोंड कापडाने बांधून आत शिरल्याचे दिसत आहे. ५ जून या दिवशी देवस्थान समितीने दानपेटीतील रोख रक्कम काढली होती. त्यामुळे अज्ञात चोरट्यांच्या हाती अंदाजे १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम लागली नसावी, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष शशांक देसाई यांनी दिली. या प्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने केपे पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरात चोरी; दानपेटी फोडली. सर्व रक्कम लंपास #GoaChandreshwarTemple #Goa #GoaNews #GoaUpdate #GoaPolice https://t.co/6HOxdUvEur
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) June 12, 2023
सुप्रसिद्ध अशा श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकार्यांनी श्वानपथक आणि ठसेतज्ञ बोलावून सविस्तर निरीक्षण केले. त्यात काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! |