‘अखिल भारतीय दशम हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी लागणार्या साहित्याची शिवणसेवा करतांना सौ. अदिती सामंत यांना जाणवलेली सूत्रे
जून २०२२ मध्ये सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे होणार्या ‘अखिल भारतीय दशम् हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी होणारे साधक आणि धर्मप्रेमी यांची निवास अन् भोजन व्यवस्था यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांना लागणार्या साहित्यांपैकी पायपोस, ताटपुसणी, अॅप्रन, पडदे असे एकूण १५०० नग शिवून द्यायचे होते. ही सेवा करतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. वेळेत सेवा पूर्ण होण्यासाठी गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना करणे
शिवणसेवा करणारे आम्ही साधक नियोजनासाठी बसलो. सर्वांनी शिवणासाठी कापड मिळण्यासाठीचे प्रयत्न आणि करावयाच्या उपाययोजना यांविषयी स्वतःचे विचार सांगितले. एकदम सगळे कापड आले, तर ते ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती, तसेच आमच्याकडे साधकसंख्या, कापड अन् जागा सर्वच अपुरे होते. तेव्हा आम्ही गुरुदेवांना शरण गेलो आणि प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, आम्हाला साहाय्य करा. आपण आमच्याकडून ही सेवा वेळेत पूर्ण करून घ्या.’
२. कापड मिळाल्यानंतर गुरुदेवांच्या आशीर्वादाने टप्प्याटप्प्यांनी सेवा चालू होणे
आम्हाला सेवेसाठी आवश्यक असे कापड चार ते आठ दिवसांनी मिळू लागले. सेवा टप्प्याटप्प्यांनी कशी पूर्ण करायची ? कुणी काय करायचे ? हा विचारही गुरुमाऊली देत होती. सेवेचे नियोजन झाल्यामुळे गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे कोणतीच अडचण आली नाही. साधकांनाही त्रास झाला नाही. आम्ही सेवा करतांनाही शरणागतभाव ठेवत होतो.
३. प्रसारातून आलेल्या साधिकांचे भावपूर्ण योगदान
गुरुकृपेनेच शिवणकामाचे कौशल्य असलेल्या प्रसारातील साधिका सेवेसाठी आल्या. या साधिकांनी छान सेवा केली. त्या साधिकांचे समष्टी सेवेसमवेतच व्यष्टीचेही प्रयत्न पूर्ण होत होते. त्यामुळे त्यांना या सेवेतून पुष्कळ आनंद मिळत होता आणि त्यांची भावजागृतीही होत होती.
४. कृतज्ञता
गुरुदेवा, सेवा करतांना आम्हाला कोणताच त्रास होऊ नये; म्हणून तुम्ही आमच्या आणि शिलाईयंत्रांच्या भोवती संरक्षककवच निर्माण केलेत. तुम्ही आम्हाला सर्व परीने साहाय्य केलेत, तसेच शिवणसेवेतील साधकांमध्ये एकी ठेवून आमच्याकडून अधिवेशनाची सेवा वेळेत पूर्ण करून घेतलीत, त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सौ. अदिती अनिल सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२२)