‘स्वतःपेक्षा इतरांना काय आवडेल ?’, याचा विचार करणार्या बार्शी (सोलापूर) येथील कु. शीतल केशव पवार (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) !
सनातन संस्थेच्या ६९ व्या संत पू. अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना त्यांच्या नणंद कु. शीतल केशव पवार (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र येथे दिले आहे.
१. स्त्रियांच्या पोशाखाच्या २ कापडांपैकी दुसर्यांना न आवडणारे कापड स्वतःसाठी घेणे
मी माझ्या नणंद कु. शीतल केशव पवार यांच्यासाठी आणि स्वतःसाठी पोषाखाची २ कापडे (ड्रेस मटेरिअल) घेतली होती. ती एकाच नक्षीची (पॅटर्नचे) २ कापडे होती. त्यांतील एकाचा रंग गुलाबी होता आणि दुसरे केशरी रंगाचे होते. ‘‘दोन्ही कापडांपैकी तुम्हाला जे आवडेल, ते तुम्ही घ्या’’, असे मी त्यांना सांगितले होते. त्यांनी गुलाबी रंगाचे कापड घेतले.
२. ‘स्वतःपेक्षा इतरांना कोणता पोशाख आवडेल आणि चांगला दिसेल ?’, याचा विचार करणे
काही दिवसांनी त्यांच्या पोशाखाविषयी आमची चर्चा चालू होती. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘गुलाबी आणि केशरी यांमधील केशरी रंगाचा पोशाख तुम्हाला चांगला दिसेल’, असे मला वाटले होते; म्हणून मी गुलाबी रंगाचा पोशाख घेतला.’’ ‘स्वतःला काय आवडते ? आणि काय चांगले दिसेल ?’ यापेक्षा ‘इतरांना काय चांगले दिसेल ?’, असा विचार करणार्या कु. शितलताई यांच्या माध्यमातून मला ‘इतरांचा विचार कसा करायचा ?’, हे शिकायला मिळाले.’
– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०२३)