सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !
सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे २०२३ या दिवशी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया येथे पाहिली. १२ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या विविध टप्प्यांतील सेवा करतांना साधकांना आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेले नामजपादी उपाय हे भाग पाहिले. आज रथनिर्मितीच्या प्रक्रियेत साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.
(भाग ८)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691460.html
१३ आ. रथाचे चित्र बनवतांना आलेल्या अनुभूती
१३ आ १. चित्रांची सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अल्प सुधारणा सांगणे, ‘प्रत्येक सेवेचा टप्पा कधी संपला ?’, ते न कळणे अन् ‘काय सेवा केली ?’, त्याचाही विसर पडणे : ‘एरव्ही सूक्ष्मातून उत्तरे काढून चित्र करतांना बर्याच वेळा प्रयोग करावे लागतात आणि तितक्या वेळा ती चित्रे परात्पर गुरुदेवांकडून तपासून घ्यावी लागतात; मात्र रथाची सेवा करतांना परात्पर गुरुदेवांनी त्यात अल्प वेळा सुधारणा सांगितल्या. ‘सेवेचा प्रत्येक टप्पा कधी चालू होऊन कधी संपायचा ?’, हे मला कळायचेही नाही. सेवेचा तो टप्पा पूर्ण झाल्यावर ‘हे झाले आहे’, असे माझ्या लक्षात यायचे; पण ‘काय केले आहे ?’, याचा मला विसर पडायचा.
१३ आ २. मन अस्थिर असतांना सेवा केल्यावरही चित्रातील स्पंदने चांगली असणे : रथाच्या चित्राची सेवा करतांना मला मानसिक त्रास होत होता आणि माझे मन अस्थिर होते. ‘त्या स्थितीतही चित्राची जी सेवा व्हायची. त्याची स्पंदने चांगलीच असायची’, याचे मलाच आश्चर्य वाटायचे; कारण ‘चित्रकाराच्या मनाच्या स्थितीचा परिणाम त्याने काढलेल्या चित्राच्या स्पंदनांवर होत असतो’, हे आतापर्यंत मी अनुभवले आहे.
१३ आ ३. ‘भगवंत स्वतःच रथ करत आहे’, याची जाणीव होणे : रथाच्या चित्राची सेवा करतांना ‘भगवंत स्वतःच हा रथ बनवत आहे’, असे मला वाटत होते. त्रासामुळे मला हे अनुभवता आले नाही; पण त्याची जाणीव राहिली.
१३ आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी सेवेतील सुटून गेलेल्या सूत्रांविषयी साधिकेला सांगणे : रथाचे चित्र दाखवण्यासाठी परात्पर गुरुदेवांकडे गेल्यावर ते ‘सेवा कुठपर्यंत आली आहे ? वेळेत होत आहे ना ?’, असे मला विचारत असत. आमच्याशी बोलतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) नेमकी आमच्याकडून सुटून गेलेली सूत्रे किंवा आमच्या अभ्यासाची दिशा चुकत असल्यास नेमकी तीच सूत्रे पुनःपुन्हा सांगायचे.
१३ आ ५. रथ पुष्कळ हलका असल्याचे जाणवणे : रथ पूर्ण झाल्यावर मला रथाचे अस्तित्वच जाणवत नव्हते. रथाकडे पाहिल्यावर त्याची भव्यता न जाणवता ‘तो पुष्कळ हलका आहे’, असे मला वाटत होते.
१३ आ ६. गरुडदेवता आणि मारुतिराया यांच्या चित्रात ‘त्यांच्या मुखावर सेवकभाव आहे’, असे जाणवणे : ‘रथावर गरुडदेवता आणि मारुतिराया यांच्या मूर्ती बसवायच्या होत्या. त्यांची चित्रे पूर्ण झाली. तेव्हा ‘दोघांच्या मुखावर ‘सेवकभाव’ आहे’, असे माझ्या लक्षात आले. मला चित्र काढतांना वाटायचे, ‘मारुतिरायामधील सतर्कता, नम्रता अन् दास्यभाव चित्रात असायला हवा.’ तसे या चित्रात आले असल्याचे मला जाणवायचे. ‘दोघेही गुरुदेवांची सेवा करत आहेत’, असे मला वाटत होते.
१३ आ ७. काही अडचणींमुळे मारुतीची मूर्ती वेळेत मिळू शकत नसल्याने रथावर मूर्ती बसवता आली नाही; पण बर्याच साधकांनी ‘रथाच्या वर सूक्ष्मातून मारुतिराया आहे’, असे अनुभवले.’
– सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा.
१३ इ. लाकडाला गोल आकार देण्यासाठी वापरायचे यंत्र (Lathe यंत्र) आणि इतर अवजारे बनवतांना आलेल्या अनुभूती
१३ इ १. रथासंबंधी सेवा चालू करण्यापूर्वी गुरुदेवांना प्रार्थना केल्याने सेवा करतांना कसलाही ताण नसणे आणि गुरुदेवांच्या कृपेमुळेच सेवा करता येणे : ‘जेव्हा मला या सेवेविषयी समजले, तेव्हा माझी मनःस्थिती चांगली नव्हती. मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘आम्हाला तुमच्यासाठी रथ बनवण्याची सेवा मिळाली आहे. माझ्याकडे जी सेवा आहे, ती तुम्ही माझ्याकडून चांगल्या प्रकारे करून घ्या.’ गुरुदेवांनीच माझ्याकडून सेवा करून घेतली. आम्ही यापूर्वी अशी सेवा कधी केली नव्हती. लाकडाला गोलाकार देणारे १२ फूट लांबीचे मोठे Lathe यंत्र (लाकडाला गोल आकार देण्यासाठीचे यंत्र) कधी बनवले नव्हते. ही सेवा करतांना मला कसलाही ताण आला नाही. रथासंबंधीच्या अन्य सेवांमध्येही मी सेवारत होतो. माझे यात कोणतेच श्रेय नाही.
१३ इ २. रथासाठी आवश्यकतेनुसार साहित्य उपलब्ध होणे, रथाच्या रचनेविषयी आपोआप सुचत जाणे आणि सेवेनंतर मनाची अस्वस्थता नष्ट होणे : रथासंबंधी सेवा करण्यासाठी ज्या टप्प्याला जे साहित्य लागणार होते, ते मिळत गेले. रथाची रचनाही आपोआप सुचत गेली आणि रथाच्या वजनाप्रमाणे त्याला लागणारे साहित्य वापरले गेले. रथाच्या चाकांच्या ‘बेअरिंग’चे (त्यामुळे रथ ओढायला सोपा जातो.) काम करतांना गुरुदेवांनी आतून जे सुचवले, तसे करत गेलो. ही सेवा अचूक झाली. कुणाला काही अडचण आली नाही. या सेवेत गुरुदेवांची माझ्यावर मोठी कृपादृष्टी होती. या सेवेनंतर माझ्या मनाची अस्वस्थता नष्ट झाली आणि आता माझ्या मनाची स्थिती पुष्कळ चांगली आहे.’
– श्री. दत्तात्रेय लोहार, खडकेवाडी, कागल, जिल्हा कोल्हापूर.
१३ ई. रथाचे रंगकाम करतांना आलेल्या अनुभूती
१३ ई १. रंग ‘स्प्रे’ करण्याचे यंत्र अकस्मात् बंद पडणे, रात्री ३ घंटे वीज नसणे आणि तरीही दीड दिवसाची सेवा ६ घंट्यांतच पूर्ण होणे : ‘रथ बनवून झाल्यावर रथाला रंग देण्यासाठी आमच्याकडे वेळ अल्प होता. रंगकाम करण्यासाठी ३ दिवस तरी हवे होते. रथाला ‘प्रायमर’ लावल्यावर सोनेरी रंग देण्यासाठी ३ दिवस हवे होते; पण ‘कॉम्प्रेसर’ (रंग ‘स्प्रे’ करण्याचे यंत्र) अकस्मात् बंद पडले. रात्री ३ घंटे वीज नव्हती. अशा पुष्कळ अडचणी आल्या. त्यामुळे आम्हाला सेवेसाठी अर्धा दिवसच मिळाला. दीड दिवसाची सेवा ६ घंट्यांतच पूर्ण झाली. तेव्हा आम्हाला वाटले, ‘भगवंत आला आणि त्यानेच सर्व केले.’
१३ ई २. वेळ अल्प असल्यामुळे आम्ही ३ दिवस रात्रं-दिवस जागरण केले. त्या वेळी ‘आम्ही रंगकाम सेवा करत नसून सेवा आपोआप होत आहे’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(समाप्त)
|