धर्मांधांच्या विरोधातील संघर्ष आणि धर्मबळाची आवश्यकता !
१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
१. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना पीठ नष्ट करण्यासाठी धर्मांध अखंड प्रयत्नरत
गाझियाबादचा संघर्ष हा इस्लामिक जिहाद्यांच्या विरुद्ध आहे. आमचे डासनादेवीचे पीठ आहे, त्या भागात ९५ टक्के मुसलमान लोकसंख्या आहे. ते पीठ कोणत्याही प्रकारे नष्ट-भ्रष्ट करण्यासाठी जिहाद्यांकडून सातत्याने कुरापती काढल्या जातात. कोणत्याही प्रकारे आम्ही कंटाळून ते स्थान सोडून निघून जावे, यासाठी सतत खोट्या खटल्यांमध्ये फसवले जाते आणि विविध प्रकारे आक्रमणे केली जातात. यापूर्वी तेथे रहात असलेल्या महंतांना धर्मांधांनी मारून पळवून लावले.
२. धर्मांधांकडून हिंदूंचा नियोजनपूर्वक केला जाणारा नरसंहार
काश्मीरमध्ये लक्षावधी हिंदूंना प्राण गमवावे लागले. त्यामुळे स्वरक्षणार्थ उर्वरित हिंदूंना घरदार सोडून पलायन करावे लागले. काश्मिरी हिंदूंना त्यांच्या शेजारीच असलेले धर्मांध त्यांचा घात करतील, याची थोडीही जाणीव नव्हती. ते धर्मांध पलायनासाठी सिद्ध असणाऱ्या शेजारच्या हिंदूंची माहिती जिहाद्यांपर्यंत पोचवायचे. ही गोष्ट सर्वप्रथम स्तंभलेखिका सुनंदा वसिष्ट यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये उचलून धरली. त्यापूर्वी काश्मिरी हिंदूंच्या वेदना जागतिक स्तरावर कधीच सांगितल्या गेल्या नाहीत. हा केवळ काश्मीरच नाही, तर संपूर्ण भारतातील हिंदूंचा प्रश्न आहे. आपण काश्मीरविषयी चर्चा करत असतांना मुलींना धारदार चाकावर चिरून टाकण्यात आले. जिच्या मृत शरिरावरही बलात्कार करण्यात आला, त्या भाग्यनगरच्या प्रियांका रेड्डीला आपण विसरून जातो. वर्ष २०२० मध्ये देहलीच्या दंगलीमध्ये अंकित शर्मा या ‘आयबी’च्या अधिकाऱ्यावर चाकूद्वारे ३०० वार करून भोसकून मारण्यात आले, देहलीसारख्या शहरात दिलबर नेगीचे हातपाय कापून त्याला आगीत फेकले जाते, हाच ‘नरसंहार’ असतो. अशा घटना थांबवण्यासाठी भारत सरकारने त्वरित ‘नरसंहार प्रतिबंधक कायदा’ करणे आवश्यक आहे. नरसंहाराच्या माध्यमातून एकेकाला क्रूरतेने मारून कोट्यवधी लोकांमध्ये दहशत निर्माण केली जाते. वर्ष २०१२-१३ मध्ये मेरठमध्ये हिंदूंचा नरसंहार झाला. तेव्हा ३ मुलांनी ज्यांच्या कुटुंबातील काही लोक पोलीस अधिकारी होते, त्यांना पोलीस चौकीजवळ घेरून ठार मारले. ते हत्याकांड एवढे निर्घृण होते की, प्रथम त्यांचे एकेक हाड तोडण्यात आले, नंतर डोळे काढण्यात आले, नंतर हळूहळू हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर एकाच गाडीच्या डिकीत घालून तलावाच्या काठावर त्यांच्या शवाचे तुकडे फेकण्यात आले. याला म्हणतात ‘नरसंहार’ ! आज भारत भयंकर युद्धाच्या दिशेने पुढे चालला आहे. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची धर्मांधांची इच्छा आहे; पण आपल्याला हिंदु राष्ट्राचा संकल्प करायचा आहे. त्यासाठी आपल्याला संघटित झाले पाहिजे.
जोपर्यंत हिंदू संघटित होऊन एकाच आवाजात विरोध करायला शिकणार नाहीत, तोपर्यंत आपण कोणतीही ‘शक्ती’ बनू शकणार नाही. हिंदु राष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाचे सूत्र आहे की, आपण धर्मबंधू आणि धर्मभगिनी आहोत. आपल्याला एकमेकांच्या वेदनांविषयी सहानुभूतीने उभे रहावे लागेल. आज आपण आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहोत. असा हा संघर्ष निरंतर चालू असून तो माझा वैयक्तिक नसून आपल्या सर्वांचा आहे.
३. सहिष्णुता आणि स्त्रीमुक्ती यांमुळे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !
ज्या लक्षावधी स्त्रियांनी स्वतःला अग्निकुंडामध्ये एकाच वेळी समर्पित करून जोहार केला होता, त्यांच्या मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये फसतात, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठे गेले आहेत ते आपले चांगले संस्कार ? आपण निश्चितपणे आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत. आपण त्यांना ‘बेबी डॉल’ (पाश्चात्त्य मुलींसारखे) बनवले. हिंदू खुल्या मनाचे आहेत. ‘खुल्या मनाचे’ या शब्दामुळेच सनातन धर्मीय लोकांचा सर्वनाश झाला आहे. खोट्या स्त्रीमुक्तीवादाने आम्हा लोकांचा सत्यानाश केला आहे.
आपल्याला सर्वप्रथम याचा आरंभ स्वतःपासूनच करायला पाहिजे. मी स्वतःचा अनुभव सांगते. आपले आईवडील कितीही धर्माचे पालन करणारे असले, तरी जेव्हा आपण धर्माचे कार्य करायला जातो, तेव्हा ते आपल्याला थांबवत असतात. माझी आई प्राध्यापिका होती. मी वकिली क्षेत्रामध्ये नवीन होते. त्या वेळी एका प्राचार्यांची मुलगी धर्मांध युवकासमवेत पळून गेल्याची घटना घडली. हे प्रकरण न्यायालयामध्ये गेले होते. त्या वेळी माझ्या वडिलांनी न्यायालयात जाऊन काय काय विषय चालू आहेत, ते ऐकायला सांगितले. मी न्यायालयात जाऊन पोचले. तेथे कुणा एका ज्येष्ठ अधिवक्त्याने मला थांबवून म्हटले, ‘‘जरा या मुलीला सांग की, तिचे वडील रुग्णालयात भरती झाले आहेत आणि हा निर्णय आम्हाला अनुकूल असा करून दे.’’ त्या मुलीने माझा हात झटकला आणि म्हणाली, ‘‘तो मुलगा मला घरी भेटवस्तू आणत होता, तेव्हा तुम्हाला ठाऊक नव्हते का ? आज माझे पिता मरत असतील, तर त्यांना खुशाल मरू द्या; परंतु मी याच्याच समवेत जाणार.’’ त्यानंतर माझा संघर्ष चालू झाला. तेव्हा मला वाटले की, यामागे निश्चित काहीतरी कारण आहे, ज्यामुळे ही मुलगी एवढ्या क्रौर्याने स्वतःच्या पित्याविषयी नकारात्मक बोलत आहे.
४. धर्मपथ हाच सत्य आणि विजय यांचा मार्ग !
आमच्या येथे एक मोकळे कब्रस्तान होते. तेथे काही लोकांनी एकत्र येऊन नमाज पठण करण्यास प्रारंभ केला होता. त्या वेळी माझे वय फार लहान होते. मी शिवसेनेशी जोडले होते. मी आवाज उठवण्याचे ठरवले आणि आपली भूमी अशा प्रकारे हातातून जाऊ दिली नाही. ही लढाई लढण्याचा असा परिणाम झाला की, माझ्या वडिलांनी मला सांगितले, ‘‘मुली माझ्या घरात असे चालणार नाही. तुझे जीवन तर निघून जाईल; परंतु माझ्याकडे तर मुसलमान अशिल येतात. आता तुझा मुसलमान अशिल माझ्याकडून त्याची ‘फाईल’ (केस) काढून घेऊन गेला. आता तुला धर्माची लढाई लढायची असेल, तर तू तुझे स्वतःचे वेगळे कार्यालय काढ. माझ्यासमवेत राहून तुला हे करणे शक्य होणार नाही.’’ मी माझे स्वतंत्र कार्यालय उघडले; परंतु ही लढाई थांबली नाही. हळूहळू मी कार्यालय सोडले आणि संन्यासी झाले. माझ्या वडिलांचे निधन झाले. शेवटच्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘मुली तू योग्य होतीस, मीच चुकीचा होतो. तुझ्या लढाईला बळ मिळो.’’ माझे वडील आर्य समाजाचे आणि बगलामुखीदेवीचे उच्च कोटीचे साधक होते आणि तेच संस्कार कदाचित् माझ्यामध्ये आले असावेत. त्यांनी जीवनात एवढी साधना केली की, त्यांना पुढे होणाऱ्या घटनांची पूर्वसूचना मिळत होती. शेवटी त्यांनी म्हटले, ‘‘मुली तू तुझा मार्ग कधीही सोडू नकोस. मृत्यू जवळ आला, तरी या मार्गावरून तोंड फिरवू नकोस; कारण धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग आहे.’’ त्या दिवशी मला वाटले की, मी काहीतरी कमावले असून मला काहीतरी मिळाले आहे. मातेने तिचा आशीर्वाद मला दिला आहे.
५. अधर्माच्या विरोधात लढण्यासाठी साधना करा !
हा संघर्ष दीर्घकालीन आहे. देशात सातत्याने नरसंहार होत आहे. हा घटनाक्रम लक्षात ठेवा आणि आपल्या संघर्षापासून विमुक्त होऊ नका. एक दिवस आपला विजय होणारच आहे. त्यासाठी आपल्याला एवढेच करायचे आहे की, आपण आपल्या मार्गावर सतत चालत रहायचे; कारण धर्माचा मार्ग हाच सत्याचा आणि विजयाचा मार्ग आहे. जे धर्मासह चालतात, त्यांच्याच पाठीशी योगेश्वर श्रीकृष्ण उभे रहातात. ईश्वराची कृपा हवी असल्यास स्वतःची आध्यात्मिक ऊर्जा आणि साधना यांना बळकटी द्या. आपल्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा नसेल, तर तुम्ही कोणत्याही दिवशी पतंगाचे (एक कीटक) शिकार होऊन जाल. आपल्या शरिरात त्या पौरूषत्वाची जाणीव करून घ्या, जी आपले पूर्वज, वीर शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये होती अन् केवळ त्या आध्यात्मिक ऊर्जेच्या बळानेच तुम्हाला ते प्राप्त होऊ शकते.’
– प.पू. यती चेतनानंद सरस्वती, महंत, डासना पीठ, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.