नथुरामचा कबुली जबाब का जाळला ? – शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते
मुंबई – नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला ? नथुराम गोडसेने जेव्हा पहिल्या दिवशी त्यांची जबानी दिली आणि न्यायाधीश तिथून निघून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले पत्रकार जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी आक्रमण केले, त्यांना घेराव घातला. त्यांच्याजवळ असलेली सगळी कागदपत्रे, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्यात आला. त्यांना दमदाटी करून ते जबानीचे सगळे कागद जाळण्यात आले. एवढेच नाही, तर सर्व पत्रकारांना धमकावण्यात आले की, एक जरी शब्द नथुरामविषयी लिहाल, तर तुमची काही खैर नाही. त्यानंतर नथुरामविषयी कधीही कोणत्या पेपरात छापून आले नाही, असे भाष्य असलेला व्हिडिओ प्रसिद्ध अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी पोस्ट केला आहे. नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी वरील पोस्ट केली आहे.