जुहू (मुंबई) येथील समुद्रात ६ जण बुडाले, २ जणांना वाचवण्यात यश !
मुंबई – मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात ६ जण बुडाल्याची दुर्घटना घडली. त्यापैकी २ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले. १२ जून या दिवशी सायंकाळी ५.३० वाजताच्या कालावधीत ही दुर्घटना घडली. अद्याप ४ जण मात्र सापडलेले नाहीत. त्यांची शोधमोहिम चालू आहे.