कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ हे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’असे करण्याची मागणी का करावी लागते ?
कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ हे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’असे करण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ? नुसते ‘गांधी’ नाव कधी दिले जात नाही, तर नेहमी ‘महात्मा गांधी’ असे नाव दिले जाते !
‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या पराक्रमामुळेच महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवरायांना एक आदर्श शासनकर्ता मानले जाते. त्यामुळे कुणीही त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत नाही. असे असतांना महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या विख्यात विद्यापिठाच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ जून २०२३ या दिवशी माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली आहे.’ (११.६.२०२३)