१६ ते २२ जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर, १२ जून (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ता, उद्योजक जाणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते कोल्हापूर येथे १२ जून या दिवशी ‘प्रेस क्लब’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, उद्धव ठाकरे गट करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.
Global #Hindu Nation Festival to be held in #Goa to brainstorm on #HinduRashtra , discuss issues faced by Hindus.@KapilMishra_IND@Vishnu_Jain1 @Aabhas24@HinduJagrutiOrg @AtriNeeraj @amitsurghttps://t.co/cFAUOIELC0 via @OpIndia_com
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) June 12, 2023