धर्मांधांकडून अल्पवयीन दलित मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या !
सीतापूर (उत्तरप्रदेश) येथील घटना !
सीतापूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात एका १६ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आलम, कैफ आणि आकिब या वासनांधांनी ९ जून या दिवशी तिच्यावर अत्याचार केल्याचे मृतकच्या वडिलांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली. या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून तिला पंख्याला लटकवून तिची हत्या केली.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दलित कुटुंब आणि बलात्कारी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. आजूबाजूच्या लोकांनी ते मिटवले होते.
पहले किया नाबालिग दलित लड़की का गैंगरेप, फिर बच्ची को फंदे पर लटकाया: सीतापुर में आलम, कैफ और आकिब गिरफ्तार#Sitapur #UttarPradeshhttps://t.co/vSDcPsjEGN
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 11, 2023
पीडितेच्या घरी जात असतांना प्रशासनाने मला रोखले ! – राष्ट्रीय हिंदु शेर सेनेचे अध्यक्षराष्ट्रीय हिंदु शेर सेनेचे अध्यक्ष विकास हिन्दू यांनी या प्रकरणी म्हटले, ‘‘मृतकच्या कुटुंबियांना हानीभरपाई देऊन आरोपींच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा. पीडितेच्या घरी जात असतांना प्रशासनाने मला रोखले. सीतापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’’ हिंदुद्वेष्टे प्रशासन ! योगी आदित्यनाथ शासनाने संबंधित प्रशासकीय अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा !- संपादक |
संपादकीय भूमिका‘जय भीम जय मीम’च्या (दलित-मुस्लिम ऐक्याच्या) घोषणा किती फसव्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! उत्तरप्रदेश सरकार या घटनेतील दोषींना फासावर लटकवणार का ? |