मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !
|
(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)
मालेगाव (जिल्हा नाशिक) – जिल्ह्यातील मालेगाव येथे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात (मसगा) मौलानांनी ११ जून या दिवशी ‘मशीद मिलन गुड करियर’ या नावाने ‘सत्य मलिक लोकसेवा ग्रुप’च्या वतीने ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्स’च्या (एन्.सी.सी.च्या) हिंदु विद्यार्थ्यांना बळजोरीने समवेत घेऊन एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला. त्यात इस्लामी धर्मगुरु आणि मौलवी यांनी हिंदु विद्यार्थ्यांना ‘एन्.सी.सी.’चे प्रशिक्षण देऊ’, असे खोटे सांगून कुराणातील आयातांची (वाक्यांची) माहिती दिली. ‘या कार्यक्रमातून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ या हेतूने हिंदु तरुणांना लक्ष्य करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे. कार्यक्रमात इस्लामी उपासनापद्धत शिकवून १ दिवसीय धर्मांतर केले आहे. या अपप्रकाराची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आणि कार्यक्रमाला विरोध केला. अनुमती न घेता कार्यक्रम आयोजित केल्याच्या प्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले आहे.
उत्तरप्रदेशातून ४० मौलवी आले !
या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी इस्लामी धर्मगुरु आणि मौलवी असे एकूण ४० जण उत्तरप्रदेशातून आल्याचे समजते. महाविद्यालयाला सुटी असतांनाही या कार्यक्रमासाठी हिंदु विद्यार्थ्यांना बळजोरीने बोलावण्यात आले होते.
(सौजन्य : ABP MAJHA)
(सौजन्य : Saam Tv)
अखेर ‘सत्य मलिक लोक सेवा ग्रुप’ संस्थेवर गुन्हा नोंद !गुन्हा नोंद न करणार्या पोलिसांना पालकमंत्री दादा भुसे यांनी धारेवर धरले !करियर मार्गदर्शनाच्या नावाखाली ‘सत्य मलिक’ संस्थेकडून विद्यार्थ्यांना धर्मपरिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मालेगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी याची गंभीर नोंद घेतली. या घटनेनंतर ‘या संस्थेवर गुन्हे नोंद करण्यास दिरंगाई झाली, तसेच पोलीस प्रशासन दबावात काम करत आहे’, असा आरोप दादा भुसे यांनी केला. त्यांनी थेट मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे गाठून २ घंटे तेथे ठाण मांडले आणि वस्तूस्थिती पोलिसांच्या लक्षात आणून देत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. शेवटी या प्रकरणी ‘सत्य मलिक’ संस्थेवर गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांसह व्याख्यात्यांनाही कह्यात घेतले होते; मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्यास विलंब करण्यात येत होता. महाविद्यालय प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप पालकमंत्री दादा भुसे यांनी केला. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी दूरभाषवरून संपर्क साधत सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मंत्री दादा भुसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने पोलिसांनी रात्री विलंबापर्यंत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आणि गुन्हा नोंद केला. |
कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !
‘महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमात इस्लामचा धार्मिक प्रचार केला जात आहे’, असा आरोप करत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कार्यक्रमाला विरोध केला. हिंदुत्वनिष्ठांनी धार्मिक संदेशपर लावलेल्या फलकांवर आक्षेप घेत घोषणा दिल्या; मात्र प्राचार्य डॉ. निकम आणि आयोजक यांनी ‘हा केवळ मार्गदर्शन कार्यक्रम आहे’, असे सांगितले. हिंदुत्वनिष्ठांनी आयोजकांनी लावलेले कार्यक्रमाचे फलक फाडले. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना बाहेर काढले. त्यानंतर शहरातील छावणी पोलीस ठाण्याजवळ सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटित झाले. (सतर्क राहून तत्परतेने विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक)
(म्हणे) ‘सत्य मलिकचे सेवाभावी कार्य !’ – ‘सत्य मलिक लोकसेवा ग्रुप’चे अध्यक्ष एजाज अहमद
‘सत्य मलिक लोकसेवा ग्रुप’ ही संघटना सामाजिक कार्य करते. कोरोनाच्या काळातही या संघटनेने मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांना सैन्य सेवेत जाण्याची संधी मिळावी, या हेतूने हे शिबिर आयोजित केले होते. यात धर्मप्रसार करण्याचा प्रश्नच येत नाही’, असे संस्थेचे अध्यक्ष एजाज अहमद म्हणाले. (असे आहे, तर इस्लामची माहिती का देण्यात आली ? – संपादक)
मालेगाव येथे प्रतिवर्षी ‘मस्जिद मीलन’ उपक्रमातून केला जातो शाळकरी हिंदु मुलांचा बुद्धीभेद !मालेगाव येथे गेल्या काही वर्षांपासून ‘मस्जिद मीलन’ या नावाने नियमित उपक्रम राबवला जातो. या उपक्रमातून हिंदु शाळकरी मुलांना मशिदीत नेऊन इस्लामची प्राथमिक ओळख करून दिली जाते आणि प्रार्थना करण्याची पद्धत शिकवली जाते. ‘मस्जिद मीलन’ या उपक्रमातून हिंदु शाळकरी मुलांचा बुद्धीभेद करून हिंदु धर्माविषयी दूषित मत बनवण्याचे षड्यंत्र मौलवी आणि काही पुरो(अधो)गामी संघटना करत आहेत. सदर घडलेल्या घटनेने या उपक्रमाला पुन्हा उजाळा देण्यात आला आहे. (किती मुसलमान मुले मंदिरात येऊन हिंदु धर्माची माहिती जाणून घेतात ?) इस्लामचा प्रचार होऊ लागल्यावर काही हिंदु विद्यार्थी निघून गेले !पुणे येथील अनीस कुट्टी यांनी उपस्थित इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना सैन्य अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती देण्याच्या बहाण्याने इस्लामचा प्रचार चालू केला. त्यामुळे कार्यक्रमाला विरोध करत काही हिंदु विद्यार्थी निघून गेले. काही विद्यार्थिंनींना कार्यक्रमात बसवून ठेवण्यात आले. (हिंदु विद्यार्थ्यांनो, केवळ निघून जाऊ नका, तर धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाजही उठवा ! – संपादक) |
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! – भाजप
व्याख्यानातून इस्लामच्या धार्मिक प्रचाराचा प्रयत्न झाला आहे. याला काही हिंदु विद्यार्थ्यांनी विरोध करत ते उठून गेले; मात्र हिंदु विद्यार्थिनींना बसवून ठेवण्यात आले होते. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे, असे भाजपचे दीपक जगताप यांनी म्हटले.
संपादकीय भूमिका
|