ऊर्ध्वरूपा तू प्रत्यक्ष अविनाशी ।
आदी पुरुष नारायण अर्थात् वासुदेव. नित्य, अनंत आणि सर्वांचा आधार आहे. प्रत्येकात सगुण रूपात तो निवास करतो; म्हणून त्याला ‘ऊर्ध्व’ नावाने संबोधित करतात. (गीता अध्याय १५/पान क्र. २२२) प.पू. गुरुदेव हे नारायणाचे अवतारी रूपच आहेत; म्हणून त्यांना ‘ऊर्ध्वरूपा’ म्हटले आहे.
ऊर्ध्वरूपा तू प्रत्यक्ष अविनाशी ।
चराचरात वास करशी ।। १ ।।
संसारात पाही जो तुजला ।
तो मुळीच मुक्त झाला ।। २ ।।
जे जे वंदनीय भक्त तुझे ।
ते ते पावतील तत्वर ते ।। ३ ।।
आम्ही उदंड जाहलो तुझ्या कृपेने ।
तारी अखंड आम्हास उभयंता ।। ४ ।।
जे जे होतसे ते ते तुझ्या कृपेने ।
ते ते प्रतीत सर्व तुझ्याच मुखे ।। ५ ।।
जन्मो जन्मी शोध झाला तुझा ।
कर्माे कर्मी बोध आता मिळाला ।। ६ ।।
सोडू नको आम्हा आता तरी ।
पावला या जन्मी तूच कृपा करी ।। ७ ।।
दिले जीवन पावन करण्यास ।
भक्ती भाव दिला रहाण्या गोप परिवारास ।। ८ ।।
नामदेवरूपी संत दिले ।
संसारातून मुक्त करून आनंद दिला ।। ९ ।।
या सर्वांचा मुकुटमणी मोक्षाप्रती ।
करती कृपा जयंत (टीप) अवतारी ।। १० ।।
घे घे चरणी मज तुझ्या परिपूर्ण ।
सार्थ करावे याच जन्मी याच देही ।। ११ ।।
टीप : जयंत म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले
– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |