सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे २०२३ या दिवशी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया येथे पाहिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

११ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या विविध टप्प्यांतील सेवा करतांना साधकांना आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेले नामजपादी उपाय हे भाग पाहिले. आज रथनिर्मितीच्या प्रक्रियेत साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.

(भाग ७)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691033.html


१३. रथनिर्मितीच्या विविध टप्प्यांतील सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

रथाची लहान प्रतिकृति

१३ अ. सुतारकाम करतांना आलेल्या अनुभूती

१३ अ १. सुतार उपलब्ध होत नसतांना आणि रथ बनवणारे सर्व जण नवीन असतांनाही ‘गुरुदेवांनीच रथ बनवण्याची सेवा करून घेतल्याची अनुभूती येणे : ‘आपल्याला अपेक्षित अशी सेवा करून देतील, असे सुतार उपलब्ध होत नव्हते. १ – २ साधक उपलब्ध झाले; पण ते अकस्मात् आजारी पडले. आरंभी १५ दिवस ‘कुणाला सेवेसाठी घ्यायचे ?’, अशी स्थिती आली होती. रथ बनवणारे सर्व जण नवीन होते. आम्ही सांगितलेले त्यांना तितकेसे समजत नव्हते. काही साधकांनी सांगितले, ‘‘आरंभी ५ दिवस तुम्ही जे सांगत होता, ते आम्हाला समजतच नव्हते. इतके आमच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण होते.’’ त्या वेळी मला वाटले, ‘हे सर्व कसे झाले ? यांना तर काहीच समजत नव्हते, तर ही सेवा कशी झाली ?’ खरेतर अशा सेवेला कुशल कारागीर लागतात. आपल्याकडे कुशल कारागीर नसूनही आहे त्या कारागिरांकडून ही ‘रथसेवा’ परात्पर गुरुदेवांनीच करून घेतली’, ही मोठी अनुभूती मला आली.

श्री. प्रकाश सुतार

१३ अ २. अनोळखी लोकांनी येऊन सेवा पूर्ण करणे : आम्ही चांगल्या कारागिरांची नावे काढली होती. त्यांचा शोध घेतला. त्यांना पुष्कळ वेळा दूरभाषही केले; पण त्यांचा काहीच प्रतिसाद नव्हता. आम्ही ज्यांना ओळखत नव्हतो आणि ज्यांचे नावही कधी घेतले नव्हते, अशा लोकांनी येऊन सेवा पूर्ण केली.

१३ अ ३. श्री. मुळवीकाका यांच्याकडे लाकडाला रंधा मारण्याचे मोठे यंत्र असणे आणि त्यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी रंधा मारण्याचे यंत्र विनामूल्य उपलब्ध करून देणे : आम्ही मोठी लाकडे खरेदी केल्यावर लाकूड गुळगुळीत करण्याच्या प्रक्रियेसाठी ‘रंधा कुठे मारायचा ?’, हा प्रश्न होता; कारण एवढे मोठे यंत्र आपल्याकडे नव्हते. त्या वेळी देवाने सुचवल्याप्रमाणे आम्ही त्या वेळी ‘मुळवी गोडाऊन’चे मालक श्री. मुळवीकाका यांना विचारले, ‘‘तुम्ही रंधा मारून देऊ शकता का ?’’ तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. त्यांनी आपल्याला रंधा मारण्याचे यंत्र विनामूल्य उपलब्ध करून दिले. आम्ही ते सर्व लाकूड घेऊन त्या सुताराकडे (मेस्त्रीकडे) गेलो. ते ६ जण होते. तेव्हा दुपारचा एक वाजला होता, तरीही त्यांनी आमच्यासाठी भोजन थांबवून आधी लाकडाला रंधा मारून दिला. त्यांच्याकडे मोठे यंत्र असल्यामुळे त्यांनी दुपारी एक ते अडीच या कालावधीत आम्हाला मोठ्या लाकडांना रंधा मारून दिला आणि नंतर भोजन केले. त्या वेळी ‘देव आपल्याला कसे साहाय्य करत आहे !’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त झाली.

१३ अ ४. एकही सुतार उपलब्ध होत नसतांना तिघांनी येऊन सेवा पूर्ण करणे : सेवेच्या अंतिम टप्प्यात एकही सुतार उपलब्ध होत नव्हता. तिघे जण त्यांच्या अडचणींमुळे येऊ शकत नव्हते; पण त्यांनी रात्री भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आम्ही उद्या येत आहोत.’’ तिघेही एकदम आले आणि ती सेवा पूर्ण झाली.

‘ते तिघे कारागीर, म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेशच होते.’ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सेवेसाठी लागणार्‍या साहित्याला हस्तस्पर्श केल्यापासून सेवेत कोणतीही अडचण न येणे अन् त्यांच्या आशीर्वादामुळे सेवा लवकर होणे

‘रामनाथी आश्रमात ज्या ठिकाणी सुतारकाम चालू होते, त्या ठिकाणी एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्या होत्या. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘त्यांना सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य दाखवूया.’ नंतर मला वाटले, ‘त्यांना साहित्याला स्पर्शही करायला सांगूया.’ त्याप्रमाणे त्यांना साहित्य दाखवल्यावर आणि त्यांनी साहित्याला स्पर्श केल्यापासून सेवेत कोणतीच अडचण आली नाही आणि सेवेची गती पुष्कळ वाढली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आशीर्वादामुळे सेवा लवकर झाली.’ – श्री. रामदास कोकाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. अंजली क्षीरसागर

१३ अ ५. ‘सेवेच्या प्रत्येक टप्प्याला आवश्यक त्या व्यक्ती आणि साधक उपलब्ध झाले अन् ती सेवा होत गेली.

१३ अ ६. ‘गुरुदेव सेवा करून घेणारच’, या श्रद्धेने मनावर ताण न येता सकारात्मक रहाता येणे : ‘गुरुदेव माझ्याकडून ही सेवा करून घेणार आहेत’, या विचाराने मी सकारात्मक होतो. माझ्या मनावर कुठलाही ताण आला नाही. माझ्या मनात ‘हे कसे होईल ?’, असा विचारच आला नाही. मला वाटत होते, ‘हे होणारच !’

१३ अ ७. प्रार्थना करून सेवा केल्यावर सर्व लाकूड व्यवस्थित पुरणे : आम्हाला रथ बनवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. प्रत्येक लाकूड वापरतांना ‘हे देवा, ‘कुठले लाकूड वापरायचे ?’, ते तू सुचव आणि तसे करवून घे’, अशी प्रार्थना करत आम्ही सेवा चालू केली. योग्य ठिकाणी योग्य लाकूड वापरता आले आणि शेवटी सर्व लाकूड व्यवस्थित पुरले.’ – श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१३ आ. रथ बनवतांना एक विंचू दिसणे आणि ‘त्या विंचवाच्या माध्यमातून एक ऋषि साधकांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते’, असे सप्तर्षींनी सांगणे : रथ ज्या ठिकाणी बनवला जात होता, त्या ठिकाणी एकदा आम्हाला विंचू दिसला. सप्तर्षींना याविषयी कळवले असता त्यांनी ‘त्या विंचवाच्या माध्यमातून एक ऋषि साधकांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते’, असे त्यांनी सांगितले. वर्ष २०२२ मध्ये जो रथोत्सव झाला होता, त्याची सजावट करतांनाही तिथे विंचू आला होता. तेव्हाही ‘विंचवाच्या माध्यमातून साक्षात् विश्वामित्रऋषि आले होते’, असे सप्तर्षींनी कळवले होते.

(क्रमश:)

– सुश्री (कु.) अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691751.html