नम्र, समजूतदार आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असे बनण्याचा प्रयत्न करणारे फोंडा (गोवा) येथील श्री. अनित पिंपळे (वय ४० वर्षे) !
ज्येष्ठ कृष्ण नवमी (१२.६.२०२३) या दिवशी श्री. अनित पिंपळे यांचा ४० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची पत्नी सौ. सायली पिंपळे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. अनित पिंपळे यांना सनातन परिवाराकडून ४० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
१. नम्रता
‘श्री. अनित नम्र आहेत. त्यांचे इतरांशी बोलणे आणि वागणे नेहमीच नम्र अन् शांत असते.
२. आवड-नावड नसणे
अ. अनित यांना खाण्याच्या संदर्भात विशेष आवड-नावड नाहीत. जेवणात जे असेल, ते आवडीने आणि समाधानाने खातात.
आ. आजारपणामुळे २ वर्षे अनित यांना पथ्याचे जेवण असायचे. जेवणात केवळ वरण-भात, घावन आणि ठराविक भाज्या चालत होत्या. ‘मला अन्य पदार्थ खाता येत नाहीत’, याबद्दल त्यांना कधी वाईट वाटले नाही.
३. समजूतदारपणा
अ. अनित यांच्यातील समजूतदारपणाचे अनेक पैलू वेगवेगळ्या प्रसंगांतून माझ्या लक्षात आले. ते साधक, नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती यांना त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांच्याशी बोलतात. स्वतःचा विचार बाजूला ठेवून इतरांना महत्त्व देतात.
आ. माझ्याकडून होणार्या चुका ते शांतपणे सांगतात. त्यांच्या समजून घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी सांगितलेल्या चुकांचा ताण न येता माझा प्रयत्न करण्यासाठी उत्साह वाढतो.
४. स्वीकारण्याची वृत्ती
त्यांच्या स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या वागण्यात लवचिकता रहाते. कोणत्याही परिस्थितीशी ते लगेच जुळवून घेतात.
५. अहं अल्प
अ. अनित यांनी साहाय्य केल्यामुळे साधकांच्या सेवेतील अडचणी सुटल्या, तर त्याचा त्यांना अहं नसतो. ‘तशी अडचण पुन्हा येऊ नये, यासाठी काय करायचे ?’, असा ते विचार करतात.
आ. अनित ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ आहेत. त्यांनी सनातन संस्थेचे काही ‘ॲप्स’ बनवण्याची सेवा केली आहे; पण त्याचा त्यांना अहं नाही. ‘देवानेच त्या सेवा करण्यासाठी मला बुद्धी दिली आहे. सर्व गुरुदेवांनीच करून घेतले’, असा त्यांचा भाव असतो.
६. गुरुदेवांना अपेक्षित असे बनण्यासाठी प्रयत्न करणे
अ. ‘स्वतःकडून देवाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होत नाहीत’, याविषयी त्यांना पुष्कळ वाईट वाटते.
आ. ‘साधनेचे प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित असे बनायचे आहे’, असे त्यांना मनापासून वाटते. त्याविषयी देवाला आत्मनिवेदन करून ते प्रयत्न करत आहेत.
‘हे गुरुमाऊली, अनेक गुणांचा संगम असलेले अनित मला पती म्हणून लाभले, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. सायली अनित पिंपळे, फोंडा, गोवा. (२५.५.२०२३)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे
अ. अनित यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रती शरणागतभाव असतो. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी ते आचरणात आणतात.
आ. ‘आपल्या घरात गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) रहातात. तेच आमचे कुटुंबप्रमुख आहेत’, असा त्यांचा भाव आहे.
इ. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये त्यांची गुरुदेवांवरील श्रद्धा अनुभवता आली. अनेक वेळा ‘गुरुदेवांनी माझ्यासाठी किती केले !’, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर होतात.
ई. अनित सतत कृतज्ञताभावात असतात. ते गुरुदेवांविषयी सांगत असतांना ‘त्यांनी अजून गुरुदेवांविषयी बोलत रहावे आणि गुरुदेवांच्या स्मरणातून बाहेर येऊ नये’, असे मला वाटते.
उ. कोणतीही मोठी अडचण निर्माण झाली, तरी ते न डगमगता ‘आपले गुरुदेव आहेत, ते सर्व नीट करणार’, असा त्यांचा ठाम विश्वास असतो.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |