अल्पवयीन मुलाचे ५ वर्षे लैंगिक शोषण करणार्या तिघांना अटक !
अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे !
गडचिरोली – ओळखीचा अपलाभ घेत ५ वर्षांपासून एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्या ३ कर्मचार्यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोघे जण शिक्षक, तर एक न्यायालयात कारकून आहे. अक्षय दादाजी रामटेके, पवन दादाजी रामटेके आणि भूपेश मोहनलाल कनोजिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या तिघांपैकी एका आरोपीच्या मित्राच्या माध्यमातून पीडित मुलाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी त्याचे शोषण केले. आरोपींपैकी एकाचे काही मासांपूर्वी लग्नही झाले आहे. त्याच्या वागणुकीवर शंका आल्याने त्याच्या पत्नीने स्वतंत्ररित्या चौकशी केली. तेव्हा आपल्या पतीचे एका अल्पवयीन मुलाशी संबंध असल्याचे तिच्या लक्षात आले आणि संपूर्ण प्रकार समोर आला. पीडित मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.