समस्तीपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीचा उपनयन संस्कार कार्यक्रमात धर्मप्रसार
समस्तीपूर (बिहार) – येथील धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू श्री. प्रकाश कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या असे दोघांच्या उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांनी उपस्थितांना धर्मशिक्षणाची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभु यांनी ‘उपनयन आणि सोळा संस्कार यांचे महत्त्व’ विषद केले. या वेळी त्यांनी कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप का करावा ?, देवघराची रचना कशी असावी ?, तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्यामागील शास्त्र आदी धर्माचरणाविषयी शास्त्रीय माहिती दिली.