‘अखिल भारतीय सनातन समिती’च्या वतीने आयोजित श्रीराम कथेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
वाराणसी (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरी धामच्या प्रांगणामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या वेळी कथावाचक पातालपुरी पीठाधीश्वर महंत बालकदासजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सर्वेश्वर श्रवणजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रामदास कोतवाल काशी उपस्थित होते. वंदनीय संतांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कथेला प्रारंभ झाला. या वेळी उपस्थित संतांचा पुष्पहार आणि पगडी घालून सत्कार करण्यात आला, तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. या प्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘महान हिंदु धर्म आणि संस्कृती’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.