पुणे येथे पालखी मार्गावर लावले चोरांच्या छायाचित्रांचे होर्डिंग्ज’ !
पिंपरी (जिल्हा पुणे) – जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. विशेष करून पालखीमध्ये होणार्या चोर्या आणि अन्य गैरघटना रोखण्यासाठी जे आरोपी आहेत, त्यांचे मोठे छायाचित्र चौकामध्ये, पालखी मार्गावर ‘होर्डिंग्ज’ उभारून पोलिसांनी लावले होते. हे छायाचित्र पाहून चोर आपल्या आसपास नाहीत ना ? याची काळजी वारकर्यांना घेता येणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे वारकरी स्वागत करत आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. मंदिर परिसरात पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांसह नागपूर, संभाजीनगर येथील लोहमार्ग पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.
पालखी सोहळ्यात चोरीच्या घटना टाळण्यासाठी सराईत चोरट्यांचे फोटो पालखी मार्गावर#Ashadhiwarihttps://t.co/9u4RtEEElH
— Lokmat (@lokmat) June 10, 2023