साई टेकडीवर नेऊन मद्य पाजून आरोपी अत्याचार करायचे ! – पीडितेचा जबाब
छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणार्या ५ आरोपींना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अतुल उबाळे यांनी ९ जून या दिवशी दिले. अक्षय चव्हाण (१९ वर्षे), शेख बबलू शेख लतीफ उपाख्य असीम पठाण (वय २४ वर्षे) आणि रामेश्वर गायकवाड (२२ वर्षे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वर्गातील मित्राच्या माध्यमातून ओळख झालेले हे आरोपी गेल्या ६ मासांपासून मध्यरात्री साई टेकडीपाशी नेऊन मद्य पाजून अत्याचार करत होते, असा जबाब पीडितेने पोलिसांकडे दिला आहे.
आरोपींना १३ जूनपर्यंत पोलस कोठडी !
मुख्य आरोपीने आपला व्हिडिओ वडिलांना पाठवण्याची धमकी देत अनोळखी व्यक्तींसमवेत हा प्रकार करण्यास भाग पाडल्याची तिची तक्रार आहे. तिच्या तक्रारीत नमूद एका मैत्रिणीने पीडितेची अल्पवयीन आरोपीसमवेत ओळख करून दिली. त्याने दुसर्या एका तरुणाशी पीडितेची ओळख करून दिली. ऑक्टोबर २०२२ मध्ये अल्पवयीन मुलाने पहाटे २ वाजता पीडितेला घराबाहेर बोलावून आरोपी अक्षय चव्हाणसमवेत साई टेकडी परिसरात नेऊन आळीपाळीने अत्याचार केला. पुढे ते व्हिडिओ आणि छायाचित्रे वडिलांना पाठवण्याची धमकी देत ६ मास हा प्रकार चालू ठेवला.
संपादकीय भूमिका :
|