पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष सज्ज !
पुणे – शहरात येणार्या लाखो वैष्णवजनांच्या सेवेसाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे आणि राजकीय पक्ष सरसावले आहेत.
शहरात ठिकठिकाणी वैष्णवांच्या स्वागताची जय्यत सिद्धता जवळपास पूर्ण झाल्याचे चित्र आहे.
बहुतांशी दिंड्यांचा मुक्काम परिचितांच्या निवासस्थानाजवळ, धार्मिक ठिकाणी, शाळांची पटांगणे अथवा मोकळ्या जागी असतो. त्या ठिकाणी हे उपक्रम राबवले जातात.