श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनाच्या निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ जून या दिवशी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी सिन्हा यांच्याकडे श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde along with his son and MP Dr Shrikant Shinde calls on Jammu and Kashmir LG Manoj Sinha in Srinagar during a visit to the UT pic.twitter.com/3iLPxUgsuK
— ANI (@ANI) June 11, 2023
पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र अशा दोघांना त्याचा लाभ होईल. श्रीनगरमधील महाराष्ट्र भवन हे केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे रहाणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य, तसेच संस्कृती यांची झलक पहाता येऊ शकेल. जम्मू-काश्मीर समवेतचे नाते अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक आणि वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असे या प्रस्तावाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.