लाखो भाविकांच्या मुखातून होणार्या हरिनामाच्या गजराने भक्तीरसात पिंपरी-चिंचवडकर न्हाऊन निघाले !
ज्ञानोबा-माऊली-तुकारामाच्या जयघोषावर महापालिका आयुक्तांनी धरला ठेका !
पिंपरी (जिल्हा पुणे) – हरिनामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केला आणि संपूर्ण वातावरण भारावून गेले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात आगमन झाले. यावेळी महानगरपालिकेचे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह आणि विविध विभागांच्या अधिकारी, वारकरी नागरिकांनी फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला.#PCMC #आषाढी_वारी pic.twitter.com/JDlqbscx1u
— PCMC (@pcmcindiagovin) June 11, 2023
विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणार्या भाविकांना पाहून महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि प्रदीप जांभळे-पाटील यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवत ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला. लाखो भाविकांच्या मुखातून होणार्या हरिनामाच्या गजराने भक्तीरसात पिंपरी-चिंचवडकर न्हाऊन निघाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखीचे निगडी येथे ११ जूनला दुपारी स्वागत करण्यात आले.