अमेरिकेत प्रथमच ‘हिंदु अमेरिकी शिखर संमेलना’चे आयोजन
अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत १४ जून या दिवशी पहिले ‘हिंदु अमेरिकी शिखर संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला अमेरिकेच्या संसदेचे सभापती केविन मॅक्कार्थी संबोधित करणार आहेत. ‘अमेरिकन्स फॉर हिंदू पॉलिटिकल अॅक्शन कमिटी’कडून याचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचा उद्देश हिंदूंच्या समस्यांवर आवाज उठवणे हा आहे. यात अमेरिकेतील १३० भारतीय वंशाचे अमेरिकी नेते सहभागी होणार आहेत.
अमेरिका के पहले हिंदू-अमेरिकन समिट में पहुंचेंगे दुनिया के 130 से ज्यादा लीडर्स, इन मुद्दों पर होगी चर्चा#hinduamericansummit #ussummit #worldnewshttps://t.co/AILhAK8WbD
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) June 11, 2023
अमेरिकेतील हृदयरोग तज्ञ डॉ. रोमेश जापरा यांनी याविषयी सांगितले की, अमेरिकेतील हिंदु देशभरात चांगले काम करत आहेत; मात्र राजकीय स्तरावर ते पुष्कळ मागे आहेत. ‘इक्वॅलिटी लॅब्स’ आणि ‘केयर’ यांसारख्य संघटना अमेरिकेत हिंदु धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांचे काही खासदार या संमेलानाला संबोधित करतील, अशी आशा आहे. यात भारतीय वंशाच्या खासदारांचाही समावेश आहे. हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
संमेलनात सहभागी होणार्या संघटनाअमेरिकन हिंदु कोएलिशन, अमेरिकन हिंदु फेडरेशन, अमेरिकन्स फॉर इक्वॅलिटी पीएसी, एकल विद्यालय, फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन्स, फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज, हिंदु अॅक्शन, हिंदु अॅक्शन पीएसी ऑफ फ्लोरिडा, हिंदु पी.ए.सी.आर्., हिंदु स्वयंसेवक संघ, हिंदु विश्वविद्यालय, कश्मीर हिंदु फाऊंडेशन, पॅट्रियट अमेरिका, सेवा इंटरनेशनल, यूएस इंडिया रिलेशनशिप कौन्सिल आणि वर्ल्ड हिंदु कौन्सिल ऑफ अमेरिका |