भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे रिझवान सय्यद याच्याकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख !
दोषींवर कारवाई न केल्यास जनआंदोलन करण्याची शिवप्रेमींची चेतावणी
जळगाव – भुसावळ येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील कर्मचारी रिझवान सय्यद याने ‘भुसावळ आगार’ या ‘व्हॉट्सअॅप’ गटावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरून त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. याचा निषेध करून त्याला अटक करावी, तसेच त्याला एस्.टी. खात्यातून बडतर्फ करावे, अशी मागणी शिवप्रेमींनी प्रांताधिकार्यांना एका निवेदनाद्वारे केली. या प्रकरणी सय्यद याला अटक करण्यात आली असून २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ‘त्याच्यावर कारवाई न झाल्यास शहरात मोठे जनआंदोलन करू’, अशी चेतावणी शिवीप्रेमींनी प्रशासनाला दिली.
प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांचासह सर्वश्री रवींद्र लेकुरवाळे, रवींद्र ढगे, राजेंद्र नाटकर, महेंद्रसिंग ठाकूर, दीपक धांडे, राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ, अधिवक्ता तुषार पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
संपादकीय भूमिका
|