(म्हणे) ‘मुलगी ही अशी गोष्ट आहे की, विश्वामित्रासारख्याचाही पाय घसरू शकतो !’ – सरवर चिश्ती
अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !
अजमेर (राजस्थान) – माणसाला पैशाने भ्रष्ट करता येत नाही, तो मूल्यांनीही भ्रष्ट होऊ शकत नाही; पण मुलगी ही एक गोष्ट अशी आहे की, कितीही मोठ्या व्यक्तीचा पाय घसरतो. विश्वामित्रासारख्यांचाही पाय घसरू शकतो. (ऋषि विश्वामित्र यांनी अप्सरा मेनकाशी विवाह केला होता. पुढे कठोर तपश्चर्या करून त्यांनी षड्रिपूंवर ताबा मिळवला आणि ते ब्रह्मऋषि झाले. हिंदूंच्या ऋषींवर अश्लाघ्य टिप्पणी करणारे मुसलमान हे सांगायला का विसरतात ? – संपादक) आज जे कुणी बाबा लोक कारागृहात आहेत ते मुलींच्याच प्रकरणात कारागृहात अडकले आहेत. हा विषयच असा आहे की, सर्वांचेच पाय घसरतात, असे विधान अजमेर दर्ग्याच्या खादिमांची (सेवेकरांची) संघटना ‘अंजुमन सय्यद जादगान’चे सचिव सरवर चिश्ती यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ ४ जूनचा असल्याचे सांगितले जात आहे. अजमेरमध्ये वर्ष १९९२ मध्ये झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर आधारित ‘अजमेर ९२’ या चित्रपटाच्या संदर्भात सरवर चिश्ती यांनी वरील विधान केले आहे. १९९२ मध्ये चिश्ती घराण्यातील काही वासनांधांनी हिंदु मुलींचे लैंगिक शोषण केले होते. त्यावर हा चित्रपट आधारित असून तो येत्या १४ जुलैला देशात प्रदर्शित होत आहे.
Sarwar Chisti of the Ajmer Dargah justifying Ajmer 1992 sex scandal, where hundreds of Hindu girls were victims. He says “larki aisi cheez hai”. pic.twitter.com/sOXpxZm87K
— Pagan 🚩 (@paganhindu) June 10, 2023
१. ‘अंजुमन सय्यद जादगान’चे सय्यद गुलाम किबरिया यांनी या संदर्भात सांगितले की, अजमेर दर्ग्यात प्रत्येक धर्माचे लोक येतात. येथून अशी विधाने केली जात असतील, तर ते चुकीचे आहे. हा व्हिडिओ अद्याप मी पाहिलेला नाही. व्हिडिओ पाहिल्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. आपला समाज महिला आणि मुली यांचा आदर करतो.
२. अजमेर शहराचे उपमहापौर नीरज जैन म्हणाले की, सरवर चिश्ती यांच्या विधानावरून त्यांची महिलांविषयीची घाणेरडी मानसिकता दिसून येती. सरवर महिलांना केवळ उपभोगाची वस्तू समजतात. हा स्त्रीशक्तीचा अपमान आहे. त्यांच्या विधानावर खादीम समाज आणि पोलीस यांनी कारवाई करावी.
संपादकीय भूमिका
|