(म्हणे) ‘हिंदु धर्म, मंदिरे आणि देव ही भाजपची वैयक्तिक संपत्ती नाही !’ – डी.के. शिवकुमार
कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे फुकाचे विधान !
उज्जैन (मध्यप्रदेश) – हिंदु धर्म, मंदिरे आणि देव ही भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक संपत्ती नाही, असे फुकाचे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले. ते मध्यप्रदेशच्या दौर्यावर आहेत. त्यांनी ११ जून या दिवशी पहाटे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली, तसेच भस्म आरतीला उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना वरील विधान केले. डी.के. शिवकुमार हे भगवान महाकाल आणि कालभैरव यांचे भक्त आहेत. ते म्हणाले, ‘‘वाईट काळ चालू असतांना मी महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला ३ वेळा आलो आहे.’’
कर्नाटक के डिप्टी CM ने महाकाल के दर्शन किए: डीके शिवकुमार बोले- हिंदुत्व, मंदिर और भगवान BJP की पर्सनल प्रॉपर्टी नहींhttps://t.co/L4lMVJFDFh #Karnataka #DKShivakumar #Mahakal pic.twitter.com/hVOp28YLMt
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 11, 2023
संपादकीय भूमिकाहिंदू संघटित होऊ लागल्याने आता काँग्रेसवाल्यांवर अशी विधाने करण्याची वेळ आली आहे. हिंदु धर्म आणि देवता ही काँग्रेसवाल्यांचीही वैयक्तिक संपत्ती नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. काँग्रेसवाल्यांनी कितीही ‘ते हिंदुविरोधी नाहीत’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदू त्यांचे खरे स्वरूप ओळखून आहेत ! |