मुले मोठेपणी चांगली व्हावीत, यासाठी त्यांच्यावर लहानपणीच साधनेचे संस्कार करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ‘आजार होऊ नये’, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे’ (Prevention is Better Than Cure), अशा अर्थाची एक म्हण आहे. ती नुसतीच सांगण्याऐवजी मोठेपणी दुर्गुण असू नये, यासाठी लहानपणापासूनच सात्त्विक संस्कार करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणी ‘कचरा करू नकोस, खोटे बोलू नकोस, कोणाला मारू नकोस’, असे मानसिक स्तरावरचे शिकवण्याच्या जोडीला त्याच्याकडून आध्यात्मिक स्तरावरील साधना करवून घेतली, तर ती मुले हळूहळू सात्त्विक होतील. त्यामुळे ती अयोग्य गोष्टी स्वतःहून करणार नाहीत. त्याचा लाभ मोठेपणीही होऊन ती भ्रष्टाचार करणे, अनीतीने वागणे, गुंडगिरी करणे इत्यादी गोष्टी करणार नाहीत. असे सर्वजण झाले की, पृथ्वीवर रामराज्याची स्थापना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले