नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार
सनातनची आयुर्वेदाची औषधे
१. पोटात वायू (गॅसेस) होणे – सनातन आमलकी (आवळा) चूर्ण
‘वायूचा (गॅसचा) त्रास होतो, तेव्हा चहाचा पाव चमचा सनातन आमलकी (आवळा) चूर्ण आणि चिमूटभर मीठ असे मिश्रण २ घोट पाण्यासह घ्यावे.
२. बद्धकोष्ठता – सनातन गंधर्व हरीतकी वटी (गोळ्या)
रात्री झोपतांना ‘सनातन गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या २ घोट पाण्यासह घ्याव्यात.
सूचना : प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)