प्रियकरासमवेत पळून जाणार्या तरुणीचा वडिलांच्या तिजोरीवर डल्ला !
साेन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख ६५ सहस्र रुपये घेऊन पलायन !
भिवंडी – प्रियकरासमवेत पळून जाण्यासाठी १८ वर्षीय तरुणीने वडिलांच्या तिजोरीवर डल्ला मारला. तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ६५ सहस्र रुपये घेऊन ती पसार झाली. तिचे आई-वडील बाहेरगावी गेले असतांना या तरुणीने हा प्रकार केला. (वडिलांच्या पैशांवर मजा मारणार्या आजच्या तरुणाईच्या भविष्याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक )