घरात आश्रय देऊन पीडितेवर अत्याचार करणार्या धर्मांधाला अटक !
नवी मुंबई – घरात आश्रय देऊन अत्याचार केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी खारघर येथील अन्वर बिस्मिला शेख (वय ३७ वर्षे) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्वर त्याच्या कुटुंबासमवेत खारघर गावातील हनुमान मंदिराजवळ रहात होता. अन्वरने पीडितेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेतला.
३ दिवसांपूर्वी ३० वर्षीय पीडितेला त्याने काम आणि भाड्याने घर मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आणि स्वतःच्या घरी आणले. तिला घर मिळेपर्यंत ती घरातच रहाणार असल्याचे त्याने त्याच्या पत्नीलाही सांगितले. मध्यरात्री अडीच वाजता कुटुंबातील सर्वजण झोपल्यावर त्याने पीडितेवर अत्याचार केला.
संपादकीय भूमिकामहिलांनो, धर्मांधाच्या घरात आश्रय घ्यायचा कि नाही, ते ठरवा ! |