गिरगाव चौपाटीवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चौपाटीवरील वाळू रस्त्यावर !
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम !
मुंबई – देशाच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर घोंगावणार्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम गिरगाव चौपाटी भागात दिसू लागला. तेथे सोसाट्याचा वारा वहात असल्याने चौपाटीवरील वाळू रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते.
Cyclone Biporjoy In Mumbai: मुंबईत बिपरजॉय चक्रीवादळ धडकलं, गिरगाव चौपाटीवर रौद्ररूप दाखवणारा VIDEO समोर https://t.co/xEF5LjTu60
— Maharashtra Times (@mataonline) June 10, 2023
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईपासून ७२० कि.मी. किंवा त्याहून अल्प अंतरावर दक्षिण पश्चिमेला हे वादळ पुढे सरकत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत धुवांधार पाऊस होईल. किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.