राज्यात १ सहस्र ४ अपघातप्रवण क्षेत्रे आढळली !
सर्वच चालकांनी अपघातप्रवण क्षेत्रांच्या संदर्भात गांभीर्य ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे !
मुंबई – राज्यातील विविध रस्त्यांवर १ सहस्र ४ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) आढळून आली आहेत. यासंदर्भातील सूची नुकतीच परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली असून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक ६१० अपघातप्रवण क्षेत्रांची नोंद करण्यात आली आहे, तर मुंबईत ही संख्या ४८ इतकी नोंदवण्यात आली आहे. नोंदी झाल्यावर तेथे रस्त्याचे रुंदीकरण करणे, दिशादर्शक फलक लावणे आणि इतर व्यवस्थापन करणे यांसह दक्षतेच्या सूचनाही दिल्या जातात.
सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्रे अहिल्यानगर येथे आढळून आली आहेत. राज्य महामार्गावर २०२ ठिकाणी ही क्षेत्रे आढळून आली.